Shrikant Kulange's Learning hub

12वी सायंस नंतर काय???

मणिपाल युनिव्हर्सटिी

या संस्थेचे अभ्यासक्रम – बॅचलर इन (१) रिनल रिप्लेसमेन्ट थेरपी अ‍ॅण्ड डायलिसिस (२) कॉíडओव्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजी, (३) मेडिकल रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी, (५) हेल्थ इन्फम्रेशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, (६) रेस्पिरेटरी थेरपी, (७) क्लिनिकल ऑप्टोमेट्री, (८) न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजी, (९) मेडिकल इमॅजिन टेक्नॉलॉजी, (१०) ऑडिओलॉजी अ‍ॅण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, (११) ऑक्युपेशनल थेरपी. अर्हता- फिजिक्स, केमेस्ट्री आणि बॉयॉलॉजीसह बारावी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण. संपर्क- डायरेक्टर, अ‍ॅडमिशन, मनीपाल, युनिव्हर्सटिी, मनिपाल- ५७६१०४, कर्नाटक, दूरध्वनी- ९२४३७७७७३३. संकेतस्थळ – www.manipal.edu

एसआरएम युनिव्हर्सटिी
या संस्थेचे अभ्यासक्रम – बॅचलर ऑफ सायन्स इन (१) रिनल डायलेसिस (कालावधी- साडेतीन वष्रे), (२) रेडिऑलॉजी अ‍ॅण्ड इमेजिन टेक्नॉलॉजी (कालावधी- चार वष्रे), संपर्क- द डायरेक्टर (अ‍ॅडमिशन) एसआरएम युनिव्हसिर्टी, एसआरएम नगर, कट्टांकुलाथूर (KATTANKULATHUR) 603203, कांचीपुरम, तामिळनाडू, दूरध्वनी- ०४४-२७४५५५१०, २७४१७४००, संकेतस्थळ- www.srmuniv.ac.in,

अम्रिता स्कूल ऑफ मेडिसीन
या संस्थेचे अभ्यासक्रम – बी.एस्सी इन (१) अनेस्थिशिआ टेक्नॉलॉजी, (२)ऑडिओलॉजी अ‍ॅण्ड स्पीच लँग्वेज पथॉलॉजी, (३) काíडअ‍ॅक पर्फुजन टेक्नालॉजी, (४) कॉíडओ व्हॅस्कुलर टेक्नॉलॉजी, (५ ) डायबेटिस सायन्स, (६ ) डायलेसिस थेरपी, (७) इलेक्ट्रॉकाड्रिओग्रॅफी टेक्नॉलॉजी, (८) ऑप्टोमेट्री, (९) फिजिशिएन असिस्टंट, (१०) रिस्पेरेटरी थेरपी, (११) बी.एस्सी इन इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजी/सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी-तीन र्वष आणि एक वर्षांची इंटर्नशीप.अर्हता-बारावी विज्ञान शाखेत (फिजिक्स ,केमिस्ट्री आणि बायॉलॉजी) ५० टक्के गुण मिळणे आवश्यक
(११) मेडिकल लेबारेटरी टेक्नालॉजी,(१२) मेडिकल रेडिओलॉजिक टेक्नॉलॉजी कालावधी-चार र्वष/बारावी विज्ञान शाखेत (फिजिक्स ,केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि बायॉलॉजी) ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. निवड-बारावीमधील गुण आणि मुलाखती. संपर्क-द अ‍ॅडमिशन कोऑíडनेटर,अम्रिता स्कूल ऑफ मेडिसिन, एआयएमस, पोन्नेकरा,पोस्ट ऑफिस-कोची-६८२०४१, दूरध्वनी-०४८४-२८५८३८३, संकेतस्थळ – amrita.edu

जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्टग्रॅज्यूएट मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च
या संस्थेचे अभ्यासक्रम- बी.एस्सी इन (१) मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलाजी (२) रेडियोथेरपी टेक्नॉलाजी (३) परफ्युजन टेक्नॉलाजी, (४) ऑपरेशन थिएटर टेक्नॉलाजी, (५) न्युक्लिअर मेडिसिन टेक्नॉलाजी ,(६) न्युरो टेक्नॉलाजी, (७) डायलेसिस टेक्नॉलाजी, (८) काíडअ‍ॅक लेबॉरेटरी टेक्नॉलाजी, (९) मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलाजी सर्टििफकेट कोर्स इन इर्मजन्सी मेडिकल टेक्निशिअन, कालावधी एक र्वष.
संपर्क – डायरेक्टर अ‍ॅडमिशन, जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्टग्रॅज्यूएट मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, धन्वंतरी नगर, पोस्ट-गोरिमेदू, पाँडिचेरी- ६०५५००६ संकेतस्थळ- http://jipmer.edu.in दूरध्वनी- ०४१३- २२९६००२
आम्र्ड फोर्स मेडिकल कॉलेज
या संस्थेचे अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ (१) लेबॉरेटरी टेक्निशिअन, (२) रेडिओग्रॅफिक टेक्निशिअन, (३) रेडिओथेरपी टेक्निशिअन, (४) काíडओ टेक्निशिअन, (५) न्युरो टेक्निशिअन, (६) ब्लड ट्रांन्सफ्युजन टेक्निशिअन, (७) ऑप्टोमेट्री टेक्निशिअन, (८) ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन, (९) एन्डोस्कोपी टेक्निशिअन, (१० ) कम्युनिटी मेडिसिन/हेल्थ इन्स्पेक्टर/इर्मजन्सी मेडिकल सíव्हस टेक्निशिअन, (११) परफ्युनिस्ट.
संपर्क-आम्र्ड फोर्स मेडिकल कॉलेज, वानवडी पुणे-४११०४०, संकेतस्थळ- ँ३३स्र्://६६६.ंऋेू.ल्ल्रू.्रल्ल, ०२०-२६३३४२३०
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक
या संस्थेचे अभ्यासक्रम-बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन (१) ट्रान्सफ्युजन मेडिसिन (२) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट (३) रेडियोथेरपी (४) रेडिओग्रॅफी (५)ऑपरेशन थिएटर (६) फॉरेन्सिक मेडिकल सायन्स, (७) लेबॉरेटरी, संपर्क- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हासल,वणी िदडोरी रोड- नाशिक-४२२००४, दूरध्वनी-०२५३-२५३ ६६९१००, संकेतस्थळ- http://www.muhs.ac.in
ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स
या संस्थेचे अभ्यासक्रम- बी.एस्सी इन (१) स्पीच अ‍ॅण्ड हिअिरग, (२) ऑप्टोमेट्री , (३) मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी-ऑनर्स (४) बॅचरल ऑफ मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, संपर्क-ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स, अन्सारी नगर, नवी दिल्ली- ११००२९, दूरध्वनी- ०११- २६५८८५००, संकेतस्थळ- http://www.aiims.edu
चेत्तीनंद अकॅडमी ऑफ रिसर्च अँड एज्युकेशन
या संस्थेचे अभ्यासक्रम – बॅचलर ऑफ सायन्स इन अलाईड हेल्थ सायन्स इन
१) ऑर्गन ट्रान्सप्लान्ट टेक्नॉलॉजी, २) अनॅस्थेसिअक टेक्नॉलॉजी, ३) रिनॅल डायलेसिस टेक्नॉलॉजी, ४) मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, ५) रेडिओलॉजी अँड इमॅजिन सायन्स टेक्नॉलॉजी, ६) काíडअ‍ॅक टेक्नालॉजी, अर्हता- सर्व अभ्यासक्रमांसाठी बारावी विज्ञान. संपर्क – चेत्तीनंद अकॅडमी ऑफ रिसर्च अँड एज्युकेशन, चेत्तीनंद हेल्थ सिटी, आयटी, हायवे, कलाबक्कम, कांचीपूरम, तामिळनाडू- ५०३ १०३, दूरध्वनी-४७४ ११ ०००, संकेतस्थळ- www.chettinadhealthcity.com
सेंटर फॉर पॅरॉमेडिकल सायन्सेस- इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी
या संस्थेचे अभ्यासक्रम – बॅचलर ऑफ सायन्स इन (१) अ‍ॅनेस्थेशिया अँड क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी, (३) रेडिएशन थेरपी टेक्नॉलॉजी, (३) मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी, (४) मेडिकल रेकार्डस अँड हेल्थ रिपोर्टस, (५) रेडिओ इमेजिंग टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन ऑप्टमेट्री, (६) पोस्ट ग्रज्युएट सर्टििफकेट इन हेल्थ इन्शुरन्स, (७) पोस्ट ग्रज्युएट सर्टििफकेट इन मेडिकल इन्फम्रेटिक्स, (८) पोस्ट ग्रज्युएट सर्टििफकेट इन मेडिकल लॉ, (९) पोस्ट ग्रज्युएट सर्टििफकेट इन क्वॉलिटी मॅनेजमेंट इन हेल्थ केअर. सर्व अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने करता येतात. संपर्क- सेंटर फॉर परॉमेडिकल सायन्सेस, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सटिी, मदान घारी, नवी दिल्ली- ११००६८, संकेतस्थळ- http://www.ignou.ac.in ईमेल- [email protected] दूरध्वनी-०११-२९५७२११३
श्री बीएम पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
या संस्थेचे अभ्यासक्रम- (१) डिप्लोमा इन मेडिकल इलस्ट्रेशन-(अर्हता-बारावी विज्ञान.) सर्टििफकेट कोर्स इन (२) गुड लेबॉरेटरी प्रॅक्टिसेस. अर्हता-बीएस्सी/डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्निशियन (३) हिस्टालॉजी टेकनिक. अर्हता-बीएस्सी/डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्निशियन, (४) एमबालिमग (embalming)- टेकनिक. अर्हता-डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्निशियन, (५) माíचयुरी टेकनिक. अर्हता-दहावी. संपर्क – श्री बीएम पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर श्रीमती बंगारामा सज्जन कॅम्पस, सोलापूर रोड, विजापूर, ५८६१०३. दूरध्वनी-०८३५२-२६४०३०.
संकेतस्थळ – www.blduniversity.org
विज्ञान शाखा- संशोधनाची अपूर्व संधी
नावीन्यपूर्ण संशोधन कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना करीयरच्या उत्तमोत्तम संधी देश-परदेशातसुद्धा उपलब्ध होतात. भारत सरकारने आता संशोधनात्मक अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी वळावे यासाठी इन्स्पायर (INSPIRE) इनोव्हेशन इन सायन्स पस्र्युट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च नावाची योजना कार्यान्वित केली आहे. त्यामुळे बारावीनंतर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखांकडेच जाण्याचा विचार पक्का केलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेचा पर्याय समोर ठेवायला काही हरकत नाही.
विज्ञान उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती-स्कॉलरशीप फॉर हायर एज्युकेशन या नावाने ही योजना राबवली जाते. एखाद्या नामवंत संशोधक किंवा संशोधन संस्थांकडे उन्हाळ्यात संशोधनासाठी या योजनेअंतर्गत संधी निर्माण करून दिली जाते. दरवर्षी दहा हजार विद्यार्थ्यांची निवड या योजनेंतर्गत केली जाते. ८० हजार रुपयांची ही शिष्यवृत्ती आहे. नसíगक आणि मूलभूत विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, सांख्यिकीशास्त्र, जैवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भूभौतिकशास्त्र, भूरसायनशास्त्र, सागरी विज्ञान या विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा इंटिग्रेटेड पदवी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. प्रत्येक राज्याच्या उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावी विज्ञानशाखेतील पहिल्या एक टक्के विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी होऊ शकते. मात्र अशा विद्यार्थ्यांनी मूलभूत आणि नसíगक विज्ञान शाखांमधील पदवी किंवा इंटिग्रेटेड पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे आवश्यक आहे. जेईई अ‍ॅडव्हान्स आणि जेईई मेन या परीक्षांमध्ये पहिल्या दहा हजारांमध्ये समाविष्ट असलेले जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील पदवी किंवा इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांना प्रवेश घेतील त्यांना सुद्धा या योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाईल. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी सेंटर फॉर बेसिक सायन्सेस या संस्थांमधील इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, राष्ट्रीय प्रज्ञा शोध योजना, जगदीश बोस राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञा शोध, नॅशनल ऑलम्पियाडमध्ये उत्तम कामगिरी करणारे जे विद्यार्थी विज्ञान शाखेत पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतील त्यांनासुद्धा या योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. ८० हजार रुपयांपकी ६० हजार रुपये रोखीने दिले जातात. २० हजार रुपये हे संशोधन कार्य ज्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल त्यांना दिले जाते. पाच वर्षांपर्यंत या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.
नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट
नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्टद्वारे (ठएरळ) भुवनेश्वरस्थित नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च आणि मुंबईस्थित डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या संस्थेतील पाच र्वष कालावधीच्या मास्टर ऑफ सायन्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो. अर्हता- बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि शारीरिकदृष्टय़ा अपंग संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण. अर्ज www.nestexam.in या संकेतस्थळावर ऑनलाइन भरता येतो. यंदा ही परीक्षा २७ मे २०१७ रोजी देशातील ६० शहरांमध्ये होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे.
ही पदव्युत्तर पदवी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र यापकी कोणत्याही एका विषयातील राहील. पाचही वर्षी विद्यार्थ्यांना नामांकित राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि विद्यापीठांमध्ये उन्हाळी किंवा हिवाळी संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांला दरमहा पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय वार्षकि २० हजार रुपयांचे आíथक साहाय्य केले जाते.
संपर्क- (१) डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, हेल्थ सेन्टर बििल्डग,युनिव्हर्सटिी ऑफ मुंबई, विद्यानगरी, कालिना कॅम्पस, मुंबई-४०००९८, दूरध्वनी-०२२-२६५२४९८३,फॅक्स-२६५२४९८२, संकेतस्थळ www.cbs.ac.in, [email protected]
(२) इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स कॅम्पस, सचिवालय मार्ग, पोस्ट ऑफिस, सनिक स्कूल भूवनेश्वर, ओरिसा-७५१००५,
दूरध्वनी-०६७४-२३०४०००, फॅक्स-२३०२४३६, वेबसाइट-niser.ac.in, ई-मेल- [email protected]
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानं इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेचे कॅम्पस कोलकाता, पुणे, भोपाळ, मोहाली आणि थिरुवनंतपुरम येथे आहेत. संस्थेचा अभ्यासक्रम बॅचलर ऑफ सायन्स- मास्टर ऑफ सायन्स म्हणजेच बी एस-एम एस या नावाने ओळखला जातो. हा पाच र्वष कालावधीचा डय़ूएल डिग्री अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला दरमहा पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. या अभ्यासक्रमाला संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टसोबत किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना आणि खएए (आयआयटी व एनआयटीमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) च्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण पुणे- ४११००८, दूरध्वनी- ०२०- २५९०८००० संकेतस्थळ – www.iiserpune.ac.in
इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स
बेगळुरुस्थित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स येथे बॅचलर ऑफ सायन्स हा चार वष्रे कालावधीचा संशोधनात्मक उपक्रमांना चालना आणि प्रोत्साहन देणारा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. बारावीमध्ये विज्ञान विषय घेणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाला JEE-ADVANCED परीक्षेच्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो.
संपर्क- डीन, अंडर ग्रॅज्युएट स्टडीज, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बेंगळुरु- ०८०- २२९३३४००, संकेतस्थळ- http://www.iisc.ernet.in/ug