मानसिक आजार

मानसिक आजार

Blog by Shrikant
जसे पोटात दुखतं, हात पाय दुखतात तसेच मनाचेही दुखणे असू शकते, पण शारीरिक दुखणे हे दिसते, पटकन लक्षात येते, पण मानसिक आजार दिसतही नाहीत आणि पटकन लक्षातही येत नाहीत. मानसिक आजारांबद्दल समाजामध्ये अनेक चुकीच्या आणि वाईट समजुती आहेत. मानसिक आजार म्हणजे फक्त वेड लागणे अशी एक गैरसमजूत आपल्या समाजात आहे आणि वेड लागले म्हणजे वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही असा समज आहे. पण मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाने, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे. मानसिक आरोग्य चांगले असण्याची लक्षणे – त्या माणसाचे मन शांत असते. इतरांबरोबर जुळवून घेता येते. कोणी नावे ठेवली , कोणी उदणीदुणी केली तरीही दुखावले न जाणे. आपल्या प्रश्नांना आपणच उत्तर शोधणे. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे ते ठरवणे. मनावर ताबा असणे. जीवनातले…
Read More