Shrikant Kulange's Learning hub

प्रतिसादाला प्रतिसाद

मी आज स्वयंपाक छान बनवला म्हणून सर्वांचा अभिप्राय अत्यंत प्रेरणादायी आला. अर्थात एका भाजीत मीठ कमी होते म्हणून आजीने प्रेमाने कानात सांगितल्याने तो विचार आपुलकीचा वाटला. प्रफुल्ला म्हणजे एक ग्रॅज्युएशन करणारी मुलगी जी काही आठवड्यांपूर्वी समुपदेशन घेण्यासाठी आली होती आणि तिला मिळणाऱ्या अभिप्रायाबद्दल विस्ताराने सांगितले होते की त्यांचा विचार कसा करायचा. आज ती समाधानी याच …

प्रतिसादाला प्रतिसाद Read More »

नकार आणि फुटबॉल

मी जेव्हा काही करायचं ठरवलं तर घरचे नेहमीच मला नकार देतात आणि या नकाराचा मला कंटाळा आलाय. कोणीच मला कसं समजून घेत नाही? नकार का याचे कारणही देत नाहीत. मग मी आयुष्यात मोठा कधी होणार तेच समजत नाही. अशी केस मागील आठवड्यात समुपदेशन साठी आली होती. त्या तरुणाला घरातून, बाहेरून नकारार्थी घंटा नेहमीच ऐकल्याने त्याचा …

नकार आणि फुटबॉल Read More »

विचारणा

मला कुणालाही काही विचारायला लाज का वाटते याबाबत एका व्यक्तीने त्याच्या स्वभावात काही बदल करावा लागेल का म्हणून माझ्याशी चर्चा केली. त्याच्याशी बोलून पूर्ण माहिती घेतल्यानंतर काही गोष्टी नक्कीच समजल्या आणि त्यातून त्याने काय करावं याचं समुपदेशन केलं. लोक विचारायला का घाबरतात? त्याला काही करणे आहेत. १. विचारल्यामुळे आपण गरजू, बावळट ठरू अशी भीती त्यांना …

विचारणा Read More »

कुंडली बुद्धिमत्तेची

नेहाची आई सांगत होती, ‘मी प्रत्येक वेळेला नेहाचे पेपर तपासले. हिनं पेपरमध्ये फारसं काही लिहिलेलंच नसतं. लिहिलं तरी प्रश्नाला धरून नसतं. प्रश्नक्रमांकही घातलेला नसतो. तिच्या टीचर्स खूप रागावतात, बोलतात. असं हताशपणे सांगत नेहाला माझ्याशी बोलायला सांगितलं. ती बिचारी कुठून सुरुवात करायची या गोंधळात.   हळूहळू तिला बोलकं करून तिच्या मनात शिरलो आणि घर घर की कहानी …

कुंडली बुद्धिमत्तेची Read More »

भीती आणि कृती

मला कित्येकदा हसायला येतं की आपण प्रत्येक वेळेस कशाची ना कशाची तरी वाट बघत असतो. त्यामध्ये, हे आपल्याला यश कधी मिळेल किंवा हे आयुष्य कधी संपेल. वास्तविक दोन्ही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. बऱ्याच क्लाएंट बरोबर बोलताना हे जाणवलं की प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींकरता वाट पाहायची सवय आहे परंतु त्यासाठी कृती करणं जमत नाही. त्यामुळे यश आपल्यापासून …

भीती आणि कृती Read More »

स्वतःची ओळख

काल समुद्रावरील खाऱ्या वाऱ्याचा अनुभव घेत, कॉफी पिताना मित्रपरिवाराने सहज एक हटके विषय काढला की आपली स्वतःची ओळख कशी करायची?  आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक व्यक्तींना समजून घेतो, समजावतो. पण एक व्यक्ती अशी आहे जिच्याशी मैत्री करण्याचं आणि आपल्या सामंजस्याच्या कक्षेत बसवण्याचं राहूनच जातं. ती व्यक्ती म्हणजे आपण स्वत:, आपला स्वभाव, आपल्या आवडीनिवडी, गुणदोष, उद्दिष्टं, …

स्वतःची ओळख Read More »

अंतर्मन आणि विचार

अचानक अशा व्यक्तीशी काल बोलणे झाले जो मला कधीच त्याच्या आयुष्याबद्दल चांगला बोलला नाही. त्याच विषयावर त्याच्याशी बोलायचे ठरवून चांगले झापले कारण अशा व्यक्ती आपल्या सभोतालच्या वातावरणात बदल करत असतात.  मनुष्य अंतःकरणातून जसा विचार करतो, तसाच तो असतो. काही लोक कायमस्वरूपी चिंताग्रस्त असतात; काही चांगलं वा सुंदर त्यांच्या डोक्यातच येत नाही. काहीतरी वाईट वा विध्वंसक …

अंतर्मन आणि विचार Read More »

कल्पनाशक्ती आणि आपण

आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या बळावर आपली स्वप्न पूर्ण करतात तर कित्येकजण त्या स्वप्नांच्या जवळपास सुध्दा भटकत नाहीत. मला यश मिळण्यात अडचणी पाहून स्वप्नीलला वैताग आलेला होता. मनात अनेक वाईट गोष्टी आजकल येतात म्हणून चिंता वाढलेली होती. त्याच्याशी गप्पा मारताना ठराविक गोष्टी त्याला सांगणे क्रमप्राप्त होते.  ‘मी अपयशी झालोय’ अशी कल्पना माणूस करू शकतो, तशीच ‘मी …

कल्पनाशक्ती आणि आपण Read More »

जबाबदारी की गुंतवणूक

मागील काही दिवस भरपूर काम आणि नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने अनेकांचे कॉल आले नाहीत आणि कुठलीही ऑनलाईन ऍक्टिव्हिटी नव्हती. आणि अचानक आज एक फोन कॉल आला आणि पुन्हा एक विषय ब्लॉग करिता देऊन गेला. विषय होता एका आईचा. आई आणि तिच्या मुली मध्ये थोडा विसंवाद निर्माण होतो आणि त्यातून तिची घालमेल की मुलं म्हणजे जबाबदारी की …

जबाबदारी की गुंतवणूक Read More »

निरोगी भांडण

नवरा बायकोचे भांडण तंटा नवीन नाही. त्यात जुने आणि नवे, दोन्ही जोडीदाराचा समावेश आहे. लग्नाच्या २० वर्षानंतर सुध्दा भांडण होते म्हणून एका गृहिणीला समुपदेशन काल करावे लागले. तिला हसत सांगितले की नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणांनुसार, विवाहित जोडप्यांपैकी 44% जोडप्यांचा असा विश्वास आहे की आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा भांडण केल्यास त्यांना निरोगी आणि उत्पादक संबंध दीर्घकाळ टिकून …

निरोगी भांडण Read More »