माझ्या जहाजावर आम्ही एकूण 31 जण आहोत यापैकी 90 टक्के लोक हे फॉरेनर्स आहेत. आम्ही इथे गेल्या तीन महिन्यापासून एक दिवस सुट्टी न घेता काम करत आहोत आणि हे काम प्रचंड शारीरिक आणि मानसिक स्वरूपाच आहे. समुद्रामध्ये अशाप्रकारचे काम करणे ही एक तारेवरची कसरत असते. त्याला कारण म्हणजे समुद्र वारा, प्रचंड गरम वातावरण, अचानक येणारा पाऊस, 12 ते 14 तासाचा काम, घरची चिंता व तिथले प्रॉब्लेम, चांगला इंटरनेट चा अभाव, फोन द्वारे कम्युनिकेशन न होणे. अशा एक ना अनेक कारणामुळे आमची परिस्थिती मानसिक आणि शारीरिक रित्या नाजूक झालेली आहे. जमिनीवरती काम आणि समुद्रातील काम यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. वेगवेगळ्या जाती-धर्माचे, देशांचे लोक जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा त्यांच्या चालीरीती व जगण्याच्या पद्धती यांच्याशी समन्वय करून एकत्र राहणं ही एक तारेवरची कसरत असते. अशावेळेस मानसिक परिणाम हा जाणवायला लागतो कारण त्याकरता लागणारी बेसिक सुविधा इथे उपलब्ध नसते. सध्याच्या परिस्थितीत मानसिक संतुलन बिघडण्याची प्रक्रिया या लॉक डाऊन मुळे अजून तेजीत आलेली आहे. मग अशा वेळेस माझं काम वाढते कारण या सर्वांना एकत्रित आणणे व त्यांच्या चिंता समुपदेश करून, नॉर्मल ठेऊन काम कंटिन्यू करणे हे गरजेचे असत. आजच्या मितीला जवळपास माझ्या बरोबर सतरा जण हे मानसिक रुग्ण आहेत कारण साऊथ आफ्रिका, युके, यूएस, व इंडोनेशिया येथील घरची परिस्थिती बिकट आहे. त्यांना सांभाळता सांभाळता कधीकधी माझा तोल जातो की काय ही शंका यायला लागते. माझ्यासमोर या सर्वांना शांत व संयमी ठेवून घरी जाईपर्यंत काळजी घेणं हे मोठ आव्हान आहे.
तरीसुद्धा या सर्व गोष्टींना तोंड देऊन मी माझ्या वेगवेगळ्या मित्र आणि त्यांचे कुटुंबीय यांना मानसिक समुपदेशन चालूच ठेवतो. मग आपल्यासारखं मलाही मन मोकळं करावसं वाटतं, नावडत्या गोष्टींबाबत बोलावसं वाटतं, परंतु ऑलरेडी इतर सर्व, अनेक कारणामुळे मानसिक अवस्थेत नाहीत असं दिसून आलंय. हे सगळं घडण्या पाठीमागं मिडीया हा अजून हातभार लावत असतो. त्यासाठीच मी सर्वांना आग्रह करतो ज्या गोष्टी अशा मानसिक डिस्टर्ब करण्यासाठी कारणीभूत ठरतात अशा गोष्टींपासून दूर राहा जसे की टीव्ही न्यूज, वर्तमानपत्र, मित्र संगती जी नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आपले मन कळत नकळत मीडियावर मोकळ करत असते. यामुळे मानसिक रित्या आपण सर्व एका खोल दरीत चाललो आहोत. हे कुठेतरी थांबवायला हवे.
काल एका ग्रुप वरून मी निघून गेलो त्याला कारण त्यांच्यापैकी कोणीच नाही. मला स्वतःला असं वाटलं की जर इतरांना आपली मते मांडण्याचा अधिकार असूनही मी त्यांना रोखणार कोण अशा विचारांना प्रवृत्त होऊन मीच थोडा वेळ ग्रुप वरून सुट्टी घेतली आणि झोपून गेलो. पहाटे जेंव्हा डोळे उघडले तेव्हा पाहतो तर ग्रुपमधील बऱ्याच मित्रांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न दिसला. मग कुठे मला माझी चूक समजली आणि ग्रुपला जॉईन झालो.
आपलं सर्वांचं नातं हे वेगळ आहे आणि प्रत्येकाला आपापल्या व्याधी वेगवेगळ्या आहेत. ग्रुप वरती शक्यतो आधीच त्रासलेल्या लोकांना अजून त्रासदायक आपलं वर्तन असू नये असं मला नेहमीच वाटतं आणि माझ्यासारखे असंख्य ग्रुप वाचक आणि सहभागी होणारे कार्यकर्ते याला अनुमोदन देतील.
तर आपणास ठरवायचं कि मन मोकळ करण्यासाठी आपण अजून काय करू शकतो जेणेकरून ऑल रेडी पीडित असलेल्या मित्रांना त्याचा त्रास होऊ नये. मानसिक संतुलन राखण्यासाठी मी आपल्या ग्रुप वर दररोज समुपदेशन करणारे विविध प्रकारचे लेख पाठवत असतो त्याला एकमेव कारण म्हणजे तुमच्याप्रती असणारे प्रेम आणि जिव्हाळा.
@श्रीकांत कुलांगे
9890420209
? ??Nice article, something to think on.
You are just awesome,
Working non stop from 3 months is not a joke and that also far far away from home ..
Hats off to your patience sir
As a human being sometimes it happens
If it’s happened what’s big deal sir.
You are doing really well and inspiring us all … good day
Truth Sir… Take care pls… In sha Allah see u soon in india
आजच्या काळात गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होत असताना ,आपण करत असलेल्या कामास सलाम ,शुभ दिवस